Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

वेल सुखाची....

June 12, 2017

Search by Tags:  वेल सुखाची ..
नविन नविन मुंबईत आलो तेव्हाची गोष्ट .नुकतेच काही कर्ज फेडून ,काही कर्ज डोक्यावर घेवुन .
माया नगरी ...जीवाची मुंबई ...करायलाच लोक इथे येतात अस नाही .काही जगण्याचा जगण्याचा संघर्ष करायसाठीही येतात.
मनात नसतांनाही आमच्यासारखे बदलीनिमीत्यही येतात .हळुहळू मुंबई आपल्याला आपलस करते.
गडचिरोलीच्या जंगलातून ..नव्यामुंबई ..ठाणे करत कोकणात जावुन मुंबईत .

कितनी बाते दिलमे दबाये
खुदसेभी छुपाये है हम
जब पुंजी जीवनभरकी
बन जाते है ये गम.
सबको मनाते मनाते
खुदसे बेवफाई
ये कैसी आशिक़ी
सनम को रुलाते गये ...
बेनाम रिश्ते निभाते गये.
(सनम को रुलाते गये -हे ईश्वराला दुखावत गेलो याअर्थी)

मुंगी वजनापेक्षा जास्त ओझ उचलते पण एवढेच कि तुरूतुरू चालता येईल .
माणुस मात्र उरफोड करत पळत रहातो....पायाखालची जमीन पादाक्रांत करण्यासाठी.

मुंबई .मुंबईने खुप शिकवले.मैत्रीचा अर्थ शिकवला. नवे धडे मिळाले.
एक मात्र नक्की तुमच्या प्रारब्धाप्रमाणे तुमच्या आजुबाजुला परिस्थिती निर्माण होते. तशी माणसं तुमचं जग बनते.
तिथेच ठरवले यशस्वी बनण्यापेक्षा आनंदी समाधानी राहुन बघावे....
त्यातही चांगली व्यक्ती किंवा माणुस ...बनने महत्वाचे.तेही फक्त स्वतासाठी.
कारण डोक्यावरचे ओझे सहन करता येईल पण मनावरचे ओझे कुठल्याही प्रवासात त्रासदायकच.

स्वताचा पायाखालचा मार्ग ....खुप पायाखाली न बघतां क्षितीजाचाअंदाज घेत सरळ बघत चालत रहावे . शर्यतीशिवाय .कारण शर्यत कधीच संपत नसते.आणि कुणी शेवटपर्यंत शर्यत जिंकत नसतो.अणि माझ्यातला 'मी 'तर कधीच नाही.

एकदा एका मोठ्या माॅल मध्ये गेलो होतो.बघण्याचे पैसे जरी कुणी घेत नसले तरी बऱ्यापैकी असमाधानाचे सॅम्पल मात्र प्रत्येकाला मिळते.
तेही टप्प्या टप्प्यात .हव्यासाला अंत नाही .आणि कुणाच्या गरजेला सीमा नाही.
चमचमत्या दुनियेत चक्करमारतांना ए सी च्या थंड वातावरणात वेगवेगळ्या परफ्युम्सचा वास ,मंद संगीत वेळेला बंधन घालत नाही .
पण तुमच्या पैशाच्या पाकीटाला बंधन असते....आता क्रेडीटकार्डला जरा कमी ...देखेंगे बादमे जो हो गा सो होगा.
तर तिथे सुंदर सुंदर घड्या़ळांच्या रांगांनी मोह पाडला.किंमती विचारल्या आठवत नाही पण त्यावेळी विचारल्यावर कळाल्या ५-५० लाखांवर.
आम्ही दोघे होतो.फक्त एकमेकांकडे बघितले .
मी गंभीरपणे म्हणाले....
छे ....मला नाही आवडले.!!'

बाहेर येवुन खुप हसायला आले.आजही येते.
कितीही उंचावर पोहचा आकाश वितभर उंचच रहाते.
आणि सुंदर रस्ता मागे पडत जातो.बरच बघायचे राहुन जाते......
आजही तस हसतां येते.
सुखाच्या आनंदाच्या गोष्टी घरातच सापडत रहातात.पुन्हा नव्याने....Ashalata Patankar's Blog

Blog Stats
  • 1133 hits