Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

बद्ध...ते बुद्ध.

June 10, 2017

Search by Tags:  बद्ध
बद्ध ?

सरकारी बंगले ,इमारती दिसतात तर सुंदर ....पण वरवर .बऱ्याच वेळा 'मेकओव्हर 'होत मुळ रुप हरवलेल्या स्थितीत.कधी छोटे पण आटोपशीर घरे ...कॅम्पस....
कधी नको तेवढी मोठी घरे.कॅम्पस..
सगळीकडे सारखीच असतील असे नाही.काही ठिकाणी ,नव्या जुण्या घरांचा नमुना .
युरोपीयन वास्तु शैलींचीत तेवढा सारखेपणा दिसतो. दगडी बाधकाम..हेही एक वैशिष्टय आहे .जुन्या किल्ल्याबद्दल कुतुहल वाटावे इतपत या वास्तु औत्स्युक्य वाढवतात.ज्ञात अज्ञात अनामिकांचे वास्तव्य होत रहाते..
जणू जग हे धर्मशाला असल्याचा प्रत्येक देवुन जाते.
काही घरे गणवेशाप्रमाणे सारखी.आता नवे अपार्टमेंट झालेत.होत आहेत.
बदल होतात ...अातुन बाहेरुन ...
नया दिन नयी रात किंवा नवी विट्टी नवा दांडू.
प्रत्येक ठिकाणी विंचवाचे घर पाठीवर.नवा नवा संसार जरा तरी साजेसा असतो...परिस्थिती प्रमाणे...आवडीप्रमाणे.
कालांतराने गरजा व आवश्यकता बदलतात ..वाढतात ..कुटुंब वाढते.घरे बदलत जातात. घराला साजेस सामान लावण्यात आणि सामानाला साजेस घर लावण्यात उमेद घालवली जाते.
मग गाढवावर मुलाबाळांना बसवुन ,कोंबडया बकऱ्या यांना घेवुन जाणाऱा कारवा बघुन कमालीची आपुलकी वाटते.
चिपळुनला बदली होती तेव्हाची गोष्ट ....
अशाच एका मुक्कामच्या ठिकाणी ,बंगला वजा घराच्या वऱ्हांड्याला बंद दारं नव्हते त्याएवजी ओढायचे ग्रील होते .. ग्रीलच्या बाहेर कडी होती. बाहेरून ग्रील सहज उघडतां येत असे.त्यामुळे दुपारच्या वेळी डुलकी घेण्याच्या वेळी मी त्या कडीला बाहेर हात घालुन बाहेरून भले मोठे कुलूप लावत असे .
एकदा बाहेरून कसला तरी गोंगाट आवाज आला .खर्र खर्र ...खुप काहीतरी बाहेरून जात असल्याचा.मी ताड्कन उठुन वऱ्हांड्यात आले.आणि बाहेर बघते तर काही लहान किशोरवयाची मुले मेंढ्यांचा मोठा कळप हाकत चालली होती अंगणातुन .एकाने मला बघितले आणि अचंबित होवून बघत कीही मिनीट थांबला....मग भानावर येत वळुन बघत पुढे चालत गेला .मी ही आत वळले ...
त्याच्या कृतीचा विचार करत....
जसा विचार केला तर मला धक्काच बसला.
तो मला माझ्या घरात बंदी समजला होता कि काय ? या विचाराने आज हसू येते.
बद्ध आणि मुक्त पर्याय ...स्वताचीच निवड असते का?त्या मुक्त आकाशाखाली वावरणाऱ्या धनगर मुलांना बघुन मलाही क्षणभर वाटले मी बदीस्त आहे की काय ...?
ते मात्र मुक्त स्वछंद ....
खरच स्वःताच स्वताला आपण किती बद्ध करतो.
निवड प्रत्येकाचीच असते.बघणाऱ्याला प्रश्न हा बद्ध कसा? कुणी केला बद्ध ?बिचारेपण ...?ज्याचा त्याचा समज.
एक बरे असते ...बदली निमीत्य फिरत ...जागा बदलत राहीले कि मोह कमी होतो. कित्येक आवडत्या नावडत्या गोष्टी सुटत जातात...सोडाव्या लागतात .इदम् न म्हणत...नाळ ..नाते जुळू पहाते पण जुळतां येत नाही...
कोकणाची ओळख ...घाट आणि किणारे .
भाताची लावणी बघावी तर कोकणात...हिरव्या डोंगरात लहान मोठे निळे धबधबे .सावळे सावळे आकाश.खळाखळा वाहणारे पाणी,डोंगर दऱ्यात हिरवे गालीछे.त्यात शेतात फिरणारी बैलांची जोडी ...मागे गाणी म्हणत लावणी करणाऱ्यांची रांग ...
कुठे निशब्ध तर कधी रोरावणारे किणारे...खेकड्यांची नक्षी.सागराची गाज...ओलसर मऊशार रेती...उगवतां मावळता पाण्याला रंगवणारा सुर्य ....निळशार आकाशही...केव्हातरी रंगुन जाते.कधीतरी काठावरच्या झाडांच्या मऊशार रेतीत सहल करावी ...घरचे डबे न्यावे आणि चटयीवर थोडे लोळावे.
क्रिकेट खेळावे .सायकल चालवावी.पिकत तिथे विकत नाही ..अस नाही .आयुष्याचा आनंद घ्यावा तर कष्टाला मागे न रहाणाऱ्या कोकणातील लोकांनी.जणू हापुसाची गोडी घ्यावी ....अजोड . भाताची लावणी तर जिव्हाळ्याचा विषय.एक गाव एक समाज संकल्पना.सारे ठरवुन .एकमताने .प्रत्येक गावात मंदीर 'महापुरुषाचे' ....म्हणजे शिवालय .शिवलिंग ....ओमकार....निराकार .महापुरूष हे नाव खुप आवडले.महा म्हणजे परम म्हणजे ...श्रेष्ठ ....पुरुष .शिवलिंग शिवशक्तीचे प्रतिक आहे .आणि म्हणून पौरुषत्व हा लिंगभेद नसुन कर्तृत्वाला अभिप्रेत आहे .
होळी गणपती सण निमीत्य .पण त्याचाही उत्सव .दशावतार असो नाहीतर होळीभोवतीचा फेर ,ग्रामदेवतेची पालखी...लहान मुलेही लहान पालखी काढतात ,गणपतीत तर वाद्यांचा आवाज ऐकून अंगातच येते जणू .
आनंद दु:ख बाहेर येण्यात मार्ग सगळ्यांचा सारखा .डोळ्यातले अश्रु ..ओठातील हसु..
निमीत्य छोटी मोठी .बाकी आयुष्यात जन्मापासूनच सर्व संस्कार सगळ्यांचे सारखेच ...फक्त परिस्थिती वेगवेगळी.
प्रत्येक ठिकाणी काही आठवणी ...जणू किनाऱ्यावरच्या रेतीत गोळा केलेली शंख शिंपले ....तेही मग कुठेतरी राहुन जातात प्रवासात...

दोन कवड्या,
चार शिंपले
काही शंख वेचले मी
सुटता रेती हातातली
सोडले ते किणारे मी ....
मग
बद्ध का विभक्त ती मी ?
भक्तही कधी बुद्ध ती मी...?Search by Tags:  बद्ध
Top

Ashalata Patankar's Blog

Blog Stats
  • 512 hits