Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

गारगोटी

June 26, 2017

Search by Tags:  गारगोटी
गारगोटी......
चरैवेती ...चरैवेती ....
केल्याने देशाटन ...
कारणास्तव
कधी अकारण
कधी .कधी कधी.
अचानक
ठरवून
प्रवास होत असतात.
एकदा एकट्याने लांबचा प्रवास करण्याचा योग आला. मोबाईल, नेट ,वाॅट्स अप,पुस्तक इ असले तरी कंटाळवाणा.८-९ तास .किंग फिशर बंद पडल्याचा एक असाही परिणाम होता .(तीच फ्लाईट त्या रूटवर होती)
समोरच्या बर्थ वर एक पन्नाशीपुढचे जोडपे.
अजुनही अशी निरागस माणसं दिसतात.तरी पण
आपण एकटे असलो की कुणाशी जास्त ओळख दाखवण्यात अर्थ नसतो. ती स्त्री वाॅशरुमला जावुन येईपर्यंत त्याने दोघांचेही बर्थ तयार करुन घेतले .वर पांघरुनही टाकून दिले .माझ्या नकळत भुवय्या कधी उंचावल्या मलाच कळले नाही. मी विचार केला थकली असेल .त्या माणसाला बॅगेवर लक्ष ठेवा असे सांगुन छान २-३ तास झोप काढली तिने .
तो लक्ष ठेवुन पुस्तक वाचत होता.
उठल्यानंतर स्त्री स्वभावानुसार गप्पा झाल्या.२५ वर्षांपुर्वी मालेगावच्या मुलीचे हैदराबादच्या मुलाशी लग्न झाले होते ते हे जोडपे..त्याने स्टेशनरी, झेरॉक्स सांभाळले.तिने घर कुळाचार .दोन मुले परदेशात .नातवंडाला बघुन भेटून परत हैदराबाद ला चालले होते .सासर, माहेर पांगले कुठे कुठे.
एका ला दोघंच .छान गप्पा चालल्या होत्या .रुममेट...?क्लासमेट ...?
नाही ...दोघे सोलमेट वाटत होते.
दोघांच्या सहजीवनाला सुसंवादाचे अस्तर होते जणू.किती दिव्यातुन असे अस्तर सहजीवणाला लागत असावे नाही?अनेक रंगीबेरंगी तडजोडींचे तुकडे बेमालुमपणे जोडलेले....विश्वासाचे टाक्यांनी.परिपुर्णतेची लेस काठाला लावलेली.
खेद नाही फक्त साफल्य.
परत परतीच्या आठ तासांच्या प्रवासात आय आय टी (मॅकॅनिकल इंजिनियरींग )खरगपूर सध्या डिफेन्समधे असलेली व्यक्ती लहान मुलगा व बायको असे तिघे समोर होते.त्यातील आई ज़रा बेधड़क वाटत होती. मुलाला वर बर्थवर चढ़ायला उद्युत करत होती .वेगातल्या चालू गाडीत दुसऱ्या डब्यातल्या त्यांच्या पाहुण्याला भेटायलाही मुलाला घेवुन जावुन आली .मुलगा थोडा सावध किंबहुना थोडा भित्रा...वडिलांसारखा आईची काॅमेंट. पण खुप हुशार स्मार्ट दिसत होता.नाही म्हणतां मी संभाषनात गुंतले लहान मुल सोबत असले कि वेगळी ओळख करून घेण्याची गरज नसते .किंबहुना जास्त गुंतण्याची शक्यता असते.
नकळत मी फ्लॅश बॅक मधे गेले.रमलेही.मी माझ्या मुलाचे बालपण बघत होते.खुप मजा वाटत होती.नकळत काही टिप्स देत होते.प्रोढ वयात हा एक फायदा असतो.
एम बी ए झालेल्या त्या आईचे स्वप्न होत पी एच डी. करण्याचे. तरीही ती एक पुर्णपणे घराला बांधलेली आई किंवा स्त्री वाटत होती.तिला स्वताला १ तास दे व आरोग्य महत्वाचे हेही सांगुन टाकले.
संभाषनाच्या मधे तिचा नवरा म्हणाला त्याला त्याच्या आईच्या चेहऱ्याचे साम्य माझ्या चेहऱ्यात दिसले.त्याच्या बायकोनेही अनुमोदन दिले .चेहऱ्यातील साम्याला ...जी चे नुकतेच देहांत झाले होते.मानवी मन कुठे कसे गुंतत जाते त्याचा नेम नाही ....आणि मातृत्वाचे तर सांगताच येत नाही.

कवी भट म्हणतात
गुंतुनी गुंत्यात साऱ्या
पाय माझा मोकळा...
पण सर्वांनाच जमेल अस नाही ....
काही गुंतून रहातात ...

पण ठरवल गजानन महाराज म्हणतात तसे

गार पाण्यातच रहाते
परी पाणी शिरू न देते
तैसे वागावे साचे
प्रपंचाते.....
प्रवासात जमले पण खऱ्या प्रपंच्यातही जमेल ....?
जातांना... येतांना ...दोन कुटूंब भेटली ...
खुप छान वेळ गेला .गप्पांमध्ये ...

कुणाला नाव विचारले नाही .ना तर फोन नंबर मागितला कोणी .ना तर पुन्हा भेटु बोलले.
फक्त त्या मुलाचे नाव लक्षात राहीले .
शौर्य ..
निघतां निघतां बोललेच की....
शौर्य बेटा डरो मत कभी ...डरके आगे जीत है...
उगीचच ....😊

Search by Tags:  गारगोटी
Top

Ashalata Patankar's Blog

Blog Stats
  • 356 hits